चोक्‍सी फरारी आरोपी घोषित

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - पीएनबी गैरव्यवहार प्रकरणात हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सीसह १७ जणांविरोधात सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात १२ हजार पानांचे दुसरे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्‍सी याला फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.सुमारे १३ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले होते. पहिल्या आरोपपत्रात नीरव मोदीला फरारी घोषित करणाऱ्या सीबीआयने दुसऱ्या आरोपपत्रात मेहुल चोक्‍सीला फरारी आरोपी म्हणून घोषित केले. आरोपपत्रात एकूण ५२ साक्षीदारांची नावे आहेत.

Web Title: Choksi missing declared accused