'पीएफ' वेळेत न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्याच्या प्रक्रियेत विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी निवृत्तीनंतर वेळेत मिळत नसल्याची प्रकरणे समोर आली होती. यामुळे या प्रलंबित काळासाठी सरकारला निवृत्त कर्मचाऱ्यांना व्याज द्यावे लागत होते. या बाबीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

यापुढे भविष्य निर्वाह निधी वेळेतच देऊन सरकारवरील अनावश्‍यक व्याजाचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ठराविक मुदतीपेक्षा अधिक काळ भविष्य निर्वाह निधी देण्यास लागल्यास ते प्रकरण प्रशासकीय मंत्रालयांच्या सचिवांकडे पाठवावे लागेल. त्यानंतर सचिव विलंब होण्याला कारणीभूत बाबींचा शोध घेतील. यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सर्व मंत्रालयांना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

Web Title: Clear PF in time; else face the action, says Central Government