देशातील कोळशाचा वापर नीचांकी पातळीवर येणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

देशात वीजनिर्मितीसाठी होणारा कोळसा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, तो १४ वर्षांतील नीचांकी पातळीवर येण्याच्या मार्गावर आहे.

नवी दिल्ली : देशात वीजनिर्मितीसाठी होणारा कोळसा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, तो १४ वर्षांतील नीचांकी पातळीवर येण्याच्या मार्गावर आहे. मागणीतील घट तसेच, स्वस्त आणि स्वच्छ, प्रदूषणमुक्त पुनर्वापर केल्या जाऊ शकणाऱ्या स्रोतांमुळे वीजनिर्मितीसाठीची कोळशाची मागणी कमी होत आहे. कोळसा उत्पादनात नोव्हेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यांत घसरण नोंदवली आहे. 

वाचा - भारतात २०१६ पासूनच मंदीची सुरवात 

‘सेंट्रल इलेक्‍ट्रिसिटी ऑथोरिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, कोळशाच्या वापरात २००५ नंतर सर्वांत मोठी घसरण झाली आहे. औद्योगिक उत्पादनात झालेली घट आणि लांबलेल्या मान्सूनचाही विपरीत परिणाम कोळशाच्या मागणीवर झाला आहे. मान्सून लांबल्यामुळे देशभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने जलविद्युत वीजनिर्मितीत मोठी वाढ झाली आहे.  गेल्या वर्षापासून कोळशापासून वीजनिर्मिती कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा - चलनवाढीचा पारा चढला

web title : Coal consumption in the country will fall to the lowest level


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coal consumption in the country will fall to the lowest level