कोचीन शिपयार्डचा रु.1,500 कोटींच्या आयपीओसाठी अर्ज सादर

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्डने अखेर तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी'कडे अर्ज सादर केला आहे.

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्डने अखेर तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी'कडे अर्ज सादर केला आहे.

कंपनीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार, गुंतवणूकदारांना 22,656,000 नव्या इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या 11,328,000 इक्विटी शेअर्सची 'ऑफर फॉर सेल'द्वारे विक्री केली जाणार आहे. एका शेअरचे दर्शनी मूल्य असून इश्यू व्यवस्थापकांसोबत चर्चा करुन आयपीओचा किंमत पट्टा ठरविण्यात येणार आहे. कंपनीला या योजनेतून सुमारे 1,400 ते 1,500 कोटी रुपयांचे भांडवल मिळण्याचा सूत्रांचा अंदाज आहे.

या निधीतून कंपनी कोचीन पोर्ट ट्रस्ट भागात आंतरराष्ट्रीय जहाज-दुरुस्ती आणि सुविधा केंद्र स्थापन करणार आहे. याशिवाय, नवीन जहाजांची बांधणी आणि मोठ्या आकाराच्या विमानाचे कॅरियर्स तयार करण्यासाठी हे भांडवल वापरण्यात येणार आहे.

Web Title: Cochin Shipyard to raise Rs 1,400-1,500 crore through IPO