'फ्रेशर्स'ना संधी देण्यासाठी वरिष्ठांची हकालपट्टी 

'फ्रेशर्स'ना संधी देण्यासाठी वरिष्ठांची हकालपट्टी 

मुंबई: कॉग्निझंटने या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने डायरेक्टर पदाच्या आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. नवीन मनुष्यबळाला संधी देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी जुन्या अधिकाऱ्यांना तीन ते चार महिन्याचा आगाऊ पगार दिला जाणार आहे. 

नवीन टॅलेंट कंपनीत आल्यास कंपनीचा फायदा होईल तसेच त्यांना वाव मिळेल. त्याचबरोबर जे जुने कर्मचारी-अधिकारी बदलांना आपलेसे करू शकले नाहीत व नवीन स्पर्धेत मागे पडले आहेत अशा वरिष्ठांना थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतला. ऑगस्ट महिन्यात ही प्रक्रिया पार पडली आहे. यासाठी कंपनीने एकूण 2.60 अब्ज रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांसाठी खर्च केली आहे. मागील वर्षी देखील 400 कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देण्यात आला होता. परंतु, यावर्षी असा कोणताही पर्याय कर्मचाऱ्यांपुढे ठेवण्यात आला नव्हता. धोरणात्मक निर्णयच भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com