‘बीएसई’वर आजपासून कमोडिटी ट्रेडिंग

‘बीएसई’वर आजपासून कमोडिटी ट्रेडिंग

मुंबई - मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आजपासून कमोडिटी ट्रेडिंग सुरू होणार आहे. कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमधील ट्रेडिंगसाठी १५० हून अधिक सदस्यांनी नोंदणी केली असल्याचे ‘बीएसई’ने म्हटले आहे. नुकताच भांडवली बाजार नियंत्रक सेबीने ‘बीएसई’ आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करण्याची परवानगी दिली होती.

सुरवातीला ‘बीएसई’मध्ये सोने आणि चांदी या कमोडिटीमध्ये फ्युचर्स ट्रेडिंग होणार आहे. कमोडिटी ट्रेडिंगमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बीएसई’ने पहिल्या वर्षासाठीचे व्यवहार शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com