सहा महिन्यांत कंपन्यांनी ‘आयपीओ’द्वारे उभारले 17,317 कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: भारतीय कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये प्रारंभिक समभाग विक्रीतून(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) तब्बल 17,317 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. त्यापैकी 13,127 कोटी रुपयांची रक्कम ऑफर फॉर सेलद्वारे उभारण्यात आली असून 4,190 कोटी रुपयांची रक्कम नव्या शेअर्सच्या विक्रीतून उभारण्यात आली आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.

एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान, एकुण 57 कंपन्यांनी आयपीओद्वारे 17,317 कोटी रुपयांचे भांडवल उभारले. त्यापैकी 42 कंपन्या लघू व मध्यम उद्योगातील(एसएमई) होत्या. पाच कंपन्यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवल उभारले. यंदा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीचा 6,057 कोटी रुपयांचा आयपीओ सर्वात मोठा होता. गेल्यावर्षी याच काळात 39 कंपन्यांनी या मार्गाने 4,904 कोटी रुपयांचे भांडवल उभारले होते.

Web Title: Companies in six months IPO made 17.317 million