२०२१ जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मूभा या कंपनीने दिली

Facebook
Facebook

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. यात आता फेसबुक कंपनी देखील सामील झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०२१ च्या जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मूभा फेसबुकने दिली आहे. एवढेच नाही तर फेसबुककडून आपल्या कर्मचाऱ्यांना ७५ हजाराचा भत्ता दिला जाणार आहे. या भत्त्याच्या मदतीने कर्मचारी घरातच ऑफिसशी निगडीत काम करण्याची तयारी करु शकतील. यापूर्वी गूगल आणि ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉमची सवलत दिली आहे. 

फेसबुकच्या प्रवक्त्या ननेका नॉर्विल यांनी सांगितले की, आरोग्य तज्ञ, सरकारी तज्ञांच्या सल्ल्लयानुसार तसेच कंपनीत वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर हा निर्णय घेतला. याशिवाय घरातून काम करताना कार्यालयाशी निगडीत गरजा भागवण्यासाठी १ हजार डॉलरचा भत्ता दिला जाणार आहे. 

गूगलकडून यापूर्वीच घोषणा
कोविड-१९ चे प्रमाण कमी होत नसल्याचे पाहून आणि त्याची तीव्रता बराच काळ राहणार असल्याने गूगल कंपनीने गेल्या महिन्यातच वर्क फ्रॉम होमबाबत घोषणा केली होती. गूगलचे सुमारे दोन लाख कर्मचारी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत घरातूनच काम करतील, असे सांगितले होते. कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याची डेडलाइन जानेवारी २०२१ दिली होती.

कार्यालय उघडणार पण...
फेसबुकने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत काही ठिकाणी मर्यादित संख्याबळावर कार्यालय सुरू करणार आहे. दोन महिन्यांपासून ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाचे खूपच कमी रुग्ण आहेत, अशा ठिकाणी कार्यालय नियमानुसार सुरू करण्यात येणार आहेत. सध्या अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत यावर्षाखेरपर्यंत कार्यालय सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुमारे ४८ हजार कर्मचारी मार्चपासून वर्क फ्रॉम होम
फेसबुकचे सुमारे ४८ हजार कर्मचारी मार्च महिन्यांपासूनच घरातून काम करत आहेत. यापूर्वी कंपनीने डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होमला मुदतवाढ दिली होती. परंतु आता हा निर्णय जुलैपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेतला. फेसबुकचे सीइओ मार्क झुकेरबर्ग यांनी मार्च महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, येत्या पाच ते दहा वर्षात निम्मे कर्मचारी कायमस्वरुपी घरातूनच काम करण्याची संधी फेसबुक कंपनी देऊ शकते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com