स्वच्छ, हरित आणि शाश्वत समाज निर्माण करण्याची संधी

world-econimic-forum
world-econimic-forum

कोरोनामुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. जग बदलून टाकणाऱ्या घटनेचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थ, भू-राजकीय परिस्थिती आणि आपल्या संपूर्ण समजावर झाले आहेत. जागतिक परिणाम आणि जोखीम हे एकमेकांवर अवलंबून असून त्याने सध्याची आणि भविष्यातील परिस्थिती पूर्णतः बदलून टाकली आहे, असे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'कोविड-19 रिस्क आऊटलूक' अहवालात म्हटले आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या गोष्टींचा अवलंब करण्यात आला. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेवर आणि उद्योग-व्यवसाय आणि सेवा क्षेत्रावर परिणाम होत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. बेरोजगारीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले. 

समाजावर दूरगामी परिणाम:
कोरोनामुळे समाजावर दूरगामी परिणाम झाले असून   रोजचे जीवन जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. 

1. ग्राहकांची मानसिकता
2. काम करण्याची पद्धत
3. तंत्रज्ञानाचा कामातील भूमिका : घरातील किंवा कार्यालयातील काम करताना

वैयक्तिक पातळी, समाज आणि सामाजिक पातळी या सगळ्याच ठिकाणी आता आलेल्या आपत्तीमुळे वागण्या-बोलण्यातील सामाजिक दृष्टीकोन बदलून टाकला आहे. लोकांच्या जगण्यात देखील एक प्रकारची तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. 

भीती आणि आशावाद
अनेक उद्योगांनी आणि कामगारांनी परिस्थिती अनुकल धोरण स्वीकारत काम केले. जगभरात काही क्षेत्रांमध्ये कामाच्या विविध पद्धतीच्या अवलंबाने आणि वित्तीय धोरणांमुळे आर्थिक व्यवस्था टिकवून ठेवली. काही देशांनी उत्पन्न झालेल्या   संकटातून मार्ग काढत अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा सुरू केली. कामाची नवी पद्धत, काम करताना प्रवास करण्याची पद्धत, संवाद साधण्याची पद्धत आणि उपभोगाने भविष्यातील कामाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे.  

जागतिक कामगार संघटनेच्या पाहणीनुसार, सूक्ष्म आणि लघु उद्योग (इसएमई) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांना पुन्हा उभे राहण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी कठीण आव्हानांचा सामना करावा लागतोय. 

ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. जागतिक पातळीवर ग्राहक प्रत्येक आठवड्यात आपल्या खर्चात कपात करतोय. एप्रिल आणि  मे महिन्या अखेरच्या आठवड्यात ग्राहकांच्या खर्चात किंचित वाढ झाली. ग्राहक पुन्हा एकदा 'नॉर्मलायझेशन'च्या परिस्थितीत येत असल्याचे दिसले. ज्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तेथील अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले आहे. 

ग्राहकांकडून सुरुवातीला गरजेच्या आणि आवश्यक वस्तूंवर खर्च करण्यात आला.  पण आता घरातील सुधारणांवर आणि कपड्यांवर खर्च केला जात आहे. मात्र अजून मनोरंजनावर कोणताही खर्च करण्यास सुरुवात केलेली नाही. 

कोविड-19 आधीची परिस्थिती येण्यासाठी दीर्घकाळ लोटावा लागणार आहे. त्यावर लस किंवा ठोस असे वैद्यकीय उपचार सापडत नाही तोवर परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे. शिवाय सगळ्यांसाठी ते कठीण कार्य ठरणार आहे. 
पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला असून दीर्घकाळ याचे परिणाम भोगावे लागणार आहे. आता या व्यवसायात देखील कमी लोकांना सामावून घेतले जाईल. 

असमानतेची दरी
कोरोनावर मात करणारे ठोस उपचारांवरच आर्थिक स्थिरता अवलंबून आहे. त्याशिवाय आर्थिक स्थेर्य प्राप्त होणार नाही. कोरोनामुळे मानसिक आजार   आणि सामाजिक अशांतता निर्माण होणार आहे. शिवाय तरुण आणि ज्येष्ठांच्या दरम्यान आर्थिक दरी वाढणार आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. बरेच लोक कामावर जाऊन जगण्यासाठी उत्पन्न मिळवावे की घरी राहून कुटुंब आणि स्वतःच्या आरोग्याला जपावे अशा द्विधा परिस्थितीत अडकले आहेत. अल्प उत्पन्न असलेला कामगार वर्गाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका असून या वर्गात मृत्यूदर सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा काळात असमानतेची दरी कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असून या समस्येवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

विकसित देशांमध्ये बेरोजगारीची स्थिती ही वर्ष 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या पातळीवर आली आहे. तर विकसनशील देशांमध्ये बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे सामाजिक अशांतता वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. 

शिक्षण क्षेत्रात असलेल्या तरुणांमध्ये कोरोनामुळे नवीन असमानता निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जगभरातील 80 टक्के विद्यार्थी (1.6 अब्ज विध्यार्थी) शाळेत जात नाहीये. अनेक गरीब घरातील विध्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी साधने उपलब्ध नाहीत. तसेच घरून काम करणे देखील अवघड झाले आहे.

कोरोना संकटातून संपूर्ण जग कसे बाहेर पडणार आहे ही सध्याचा घडीची सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येकाला, समाजाला आणि संपूर्ण जगाला फक्त 'हेल्थकेअर'वर लक्ष देण्याची गरज नसून निसर्ग, शाश्वतता, असमानता, मानसिक आरोग्य यावर लक्ष देण्याची सर्वाधिक गरज आहे. जर यावर लक्ष केंद्रित केले नाहीतर असमानतेची दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

कोरोनाने दिली एक संधी
कोरोनाने सर्वांना स्वच्छ, हरित आणि शाश्वत असा समाज पुन्हा निर्माण करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे समाज आणि समाजातील प्रत्येकाला हातात हात घेऊन काम करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com