esakal | 'कोरोनाची दुसरी लाट ठरणार अर्थव्यवस्थेला धोकादायक'
sakal

बोलून बातमी शोधा

rbi

आरबीआय एमपीसीच्या ( MPC) बैठकीत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सध्याची अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या साथीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

'कोरोनाची दुसरी लाट ठरणार अर्थव्यवस्थेला धोकादायक'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आरबीआय एमपीसीच्या ( MPC) बैठकीत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सध्याची अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या साथीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दास म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट आली तर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे कठीण जाईल. डेप्युटी गव्हर्नर मायकल देब पात्रा यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो.

कोरोनाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. देशाचा जीडीपीचा दर शुन्याच्या खाली गेला आहे. 'आता पूर्वीच्या परिस्थितीपर्यंत पोहोचायला तीन ते चार तिमाहीचा कालावधी लागेल, अशी चिंताही एमपीसीच्या सदस्यांनी व्यक्त केली. 

Corona Impact: भारतातील लक्झरी कारचा व्यवसाय 5 ते 7 वर्षांनी मागे, 'Audi'चा अंदाज

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, रेपो रेट कपातीसंबंधीचा निर्णय पुढील परिस्थितीवर अवलंबून असेल. महागाईचा दर प्रमाणात राहिला तर व्याजदरात आणखी कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो.

'बाजारपेठेतील तरलतेचा ओघ वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरलतेचा प्रवाह वाढवण्यासाठी केवळ रेपो रेट मध्ये कपात करणे हाच एकमेव मार्ग नसून इतर उपाययोजनाही केल्या जातील, अशी माहिती या बैठकीतील सदस्यांनी दिली.

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांच्याव्यतिरिक्त डॉ. शशांक भिडे, डॉ. अमिषा गोयल, प्रोफेसर जयंत वर्मा, डॉ. एम.के. सागर आणि डॉ. मायकल देब पात्रा यांचा समावेश आहे.

loading image