CoronaVirus : कोरोना व्हायरसचा 'या' कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

प्रथमेश माल्या
मंगळवार, 24 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा परिणाम स्पॉट गोल्डच्या किंमतीवर झाला असून त्या मागील आठवड्यात १.४ टक्के दराने कमी झाल्या. या व्हायरसने जागतिक स्तरावर २.३ लाख लोकांवर परिणाम केला असून जागतिक स्तरावर विकासाची शक्यता कमी झाली आहे.  त्यामुळे यलो मेटलच्या विक्रीत मोठी वाढ झाली, कारण लोकांनी सराफाच्या तुलनेत लिक्विडिटीला प्राधान्य दिले आहे.  ​

कोरोना व्हायरसमुळे धातूंच्या किंमती कमी झाल्या असून सध्याच्या धातूंच्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूकदार लिक्विडिटीला पसंती देत आहेत. सरकारने शहरांना लॉकडाउन केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत तयार उत्पादनांत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवरही परिणाम झाला आहे.

सोने: जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा परिणाम स्पॉट गोल्डच्या किंमतीवर झाला असून त्या मागील आठवड्यात १.४ टक्के दराने कमी झाल्या. या व्हायरसने जागतिक स्तरावर २.३ लाख लोकांवर परिणाम केला असून जागतिक स्तरावर विकासाची शक्यता कमी झाली आहे.  त्यामुळे यलो मेटलच्या विक्रीत मोठी वाढ झाली, कारण लोकांनी सराफाच्या तुलनेत लिक्विडिटीला प्राधान्य दिले आहे.  याचा अनेक वर्षांचा उच्चांक गाठत अमेरिकन डॉलरवर थेट परिणाम झाला. गुंतवणूकदारांनी रोख रक्कम मिळवण्यासाठी बाजारात सोन्याची विक्री केली.  सोन्याच्या भावात घट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे अमेरिका सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केलेली १ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची घोषणा. याद्वारे दोन आठवड्यांच्या आत १ हजार डॉलरचे चेक वितरित केले जातील. सध्याच्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति तोळा ४० हजार रुपयांपर्यंत कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

तांबे: जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याच्या भीतीमुळे तांब्याच्या किंमतीवरही परिणाम झाला. लंडन मेटल एक्सचेंजवर बेस मेटलच्या किंमती नकारात्मक परिणाम दाखवत ९.९ टक्के दराने कमी झाल्या.  कारण सध्या गुंतवणुकदार अमेरिकन डॉलरच्या सुरक्षित आश्रय स्थानाकडे जाणे पसंत करत आहेत. कारण सध्याच्या काळात तेच चांगला परतावा देतात. प्रमुख सेंट्रलाइज्ड बँकांनी लिक्विडिटी इन्फ्यूजन असूनही अमेरिकन डॉलरला प्राधान्य दिल्याने बेस मेटलच्या किंमतींवर ताण आला आहे.   

कच्चे तेल:  सौदी अरेबिया आणि रशियासह बड्या तेल उत्पादक कंपन्यांनी ही कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवला असला तरी चीन, भारत आणि युरोपियन युनियनसारख्या आर्थिक केंद्रांकडून कमी मागणी असल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमती गेल्या आठवड्यात १४ टक्क्यांपेक्षा कमी झाल्या आहेत.  अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि इतर जागतिक कंपन्यांनी आपत्कालीन दर कपात केली तरी डब्ल्यूटीआय क्रूड बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले असून प्रति बॅरल तेलाच्या किंमती ३० डॉलरपेक्षा जास्त घसरल्या आहेत.  कोरोना व्हायरस प्रसाराच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कारखान्याचे उत्पादन ३० वर्षांत प्रचंड वेगाने घसरले आहे. सौदी आणि रशिया या दोघांमधील तेल युद्धयाबरोबरच कोव्हीड १९च्या महामारीचा जागतिक स्तरावर व्यापक परिणाम यामुळे जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा जास्त होईल. अधिकृत सूत्रांच्या मते, पुढील महिन्यात सौदी अरेबिया तेलाच्या बाजारात दररोज १२.३ दशलक्ष बॅरल्सचा पुरवठा करत राहील. त्यामुळे काही आठवड्यात बाजारात तेलाची रेलचेल पहायला मिळेल.

( लेखक नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीज, एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विश्लेषक आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus has a major impact on the cost of Gold copper crude oil commodities