प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे विजय मल्ल्यांना निर्देश

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांच्या मुलाला 4 कोटी डॉलर वर्ग केल्याप्रकरणी तीन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांच्या मुलाला 4 कोटी डॉलर वर्ग केल्याप्रकरणी तीन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या प्रकरणी विजय मल्ल्या यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने केलेल्या याचिकेवर 2 फेबुवारीला सुनावणी होणार आहे. मल्ल्या यांनी त्यांच्या मुलाला 4 कोटी डॉलर वर्ग केले असून, हा कर्जवसुली लवाद आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा भंग असल्याचे म्हणणे बॅंकांच्या गटाने न्यायालयात मांडले. मल्ल्या आणि त्यांच्या कंपनीवर बॅंकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, मल्ल्या यांनी मुलाला दिलेले पैसे बॅंकांना द्यायला हवे होते, असेही म्हटले आहे.

मल्ल्यांचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी बॅंकांच्या याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडून अवधी मागून घेतला. मल्ल्या यांना दिएगो कंपनीकडून 4 कोटी डॉलर मिळाले होते. ही माहिती त्यांनी लपवून ठेवली होती.

Web Title: court directs vijay mallya to file affidavit