बिटकॉइन एक्सचेंज भारताबाहेर जाण्याच्या तयारीत 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई: रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नुकत्याच झालेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात 'क्रिप्टोकरन्सी' अर्थात आभासी चलनाच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी आता जेबपे, यूरोकॉइन, कॉइनसिक्योर, बाययूकॉईन आणि बीटीसीएक्स इंडियाप्रमाणे बरेच बिटकॉइन एक्सचेंज भारताबाहेर मुख्यालय नेण्याच्या तयारीत आहेत. 

आरबीआयने घेतलेल्या निर्णयानंतर बिटकॉइन एक्सचेंजने पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बिटकॉइन एक्सचेंजने कायदेशीर सल्लामसलत घेण्यास सुरुवात केली असून ते  सिंगापूर, डेलावेअर किंवा बेलारूससारख्या देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे. गेल्या गुरुवारी आरबीआय 'क्रिप्टोकरन्सी' अर्थात आभासी चलनाच्या व्यवहारांवर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर  'क्रिप्टोकरन्सी' गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा सुरु झाला. हे एक्सचेंजेस देशातील कामकाज बंद  करण्यापूर्वी विद्यमान ग्राहकांचे व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक्सचेंजेसच्या मते, भारताबाहेर बिटकॉइन एक्सचेंज हलवल्यास भारतातील काही कायदे त्यांना लागू होणार नाहीत. 

बिटकॉइन संदर्भातील तज्ज्ञ म्हणतात की,''बिटकॉइन एक्सचेंजकडे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे भारतातील व्यवसाय बंद करणे किंवा भारताबाहेर मुख्यालय नेण्याच्या तयारी करणे.''
 
Web Title: Cryptocurrency exchanges look to shift base abroad