‘सीएसआर’अंतर्गत चारशे कंपन्यांनी दिले रु.5,857 कोटी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली: कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणजेच औद्योगिक घराण्यांची सामाजिक बांधिलकीअंतर्गत कंपन्यांनी रु.5,857 कोटींचा निधी दिला आहे. चारशे कंपन्यांनी गेल्या दोन वर्षात विविध सामाजिक कार्यांसाठी रु.5,857 कोटींचा निधी दिला आहे.

1 एप्रिल, 2014 रोजी ‘सीएसआर’ धोरण अंमलात आणले गेले. वर्ष 2015-16 मध्ये 172 कंपन्यांनी रु.3,360 कोटींचा निधी दिला होता.

नव्या कंपनी कायद्याप्रमाणे रु.100 कोटींचे निव्वळ मूल्य असलेल्या प्रत्येक कंपनीला वार्षिक सरासरी नफ्यातील किमान 2 टक्के नफा सीएसआरसाठी राखून ठेवण्याची सक्ती आहे. सीएसआर खर्चात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. एनटीपीसी, एनएमडीसी, टाटा स्टील, ऑईल इंडिया, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या कंपन्या सीएसआर अर्थात सामाजिक जबाबदारी पाळण्यात अव्वल स्थानी आहेत.

Web Title: CSR: 400 cos spend Rs 5,857 crore in 2 years