टीसीएसचे शेअरधारक मिस्त्रींबाबत आज देणार कौल

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई: टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींची हकालपट्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या टाटा इंडस्ट्रीजच्या बैठकीत त्यांना संचालक पदावरुन देखील काढून टाकण्यात आले आहे. आज (मंगळवार) टाटा समूहातील सर्वात मोठी आणि देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसची पहिली विशेष सर्वसाधारण बैठक होणार आहे. त्यामध्ये मिस्त्रींबाबतच्या निर्णयासाठी मतदान होणार आहे.

टीसीएस पाठोपाठ टाटा समूहातील अन्य कंपन्यांनी देखील बैठक बोलवली आहे. टीसीएसमध्ये टाटा सन्सची सुमारे 73 टक्के हिस्सेदारी आहे. टाटा सन्सने मिस्त्री यांना टीसीएसच्या अध्यक्षपदावरून दूर करताना १० नोव्हेंबरपासून कंपनीच्या संचालक मंडळावरील इशात हुसैन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केली आहे.

टाटा समूहातील अन्य कंपन्यांच्या विशेष सर्वसाधारण बैठकी पुढील तारखांना पार पडणार आहे.
टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस – 14 डिसेंबर
इंडियन हॉटेल – 20 डिसेंबर
टाटा स्टील – 21 डिसेंबर
टाटा मोटर्स – 22 डिसेंबर
टाटा केमिकल्स – 23 डिसेंबर
टाटा पॉवर – 26 डिसेंबर

Web Title: Cyrus Mistry to face TCS shareholders’ vote today