TCS मधून सायरस मिस्त्रींना हटविले

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई : सायरस मिस्त्री यांना आणखी एक धक्का बसला आहे. टाटा सन्सने आज (गुरुवारी) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदी ईशात हुसेन यांची निवड केली आहे.

आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदी कायमस्वरुपी अध्यक्षाची निवड होईपर्यंत हुसेन हे सायरस मिस्त्री यांची जागा घेतील. टाटा सन्सने विशेष सर्वसाधारण बैठक बोलावून सायरस मिस्त्री यांना कंपनीच्या संचालकपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. टीसीएसने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (बीएसई) देखील यांच्या हकालपट्टी करण्यात आल्याचे कळविण्यात आले.

सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा शेअर 2203.55 रुपयांवर व्यवहार करत असून तो 32.50 रुपयांनी म्हणजेच 1.50 टक्क्यांनी वधारला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.434,262.61 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Cyrus Mistry replaced as TCS chairman