सायरस मिस्त्रींचा 6 कंपन्यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी स्वत:हून सहा कंपन्यांचा राजीनामा दिला. भागधारकांना लिहीलेल्या पत्रात मिस्त्री यांनी सहा कंपन्यांचा राजीनामा देत असल्याचे सांगत सध्या सुरू असलेली लढाई आता उच्च स्तरावर नेण्याचा इरादाही व्यक्त केला.

टाटा सन्स आणि भागधारकांना लिहीलेल्या पत्रात मिस्त्री म्हणाले, ""आता अशी वेळ आली आहे की आपल्याला टाटा समूहाच्या हितासाठी आणि मजबूतीसाठी एकसाथ उठून उभारण्याची गरज आहे. माझ्या राजीनाम्यानंतर टाटांकडून कोणतीही ठोस पावले उचलली जाणार नाहीत. त्यामुळे मी विश्‍वस्त मंडळाचा स्वत:हून राजीनामा देत आहे. परंतु मी सुरू केलेली लढाई आता उच्च स्तरावर लढणार आहे.''

आयएचसीएलच्या 2015-16 च्या अहवालानुसार टाटा समूहातील कंपन्यांमध्ये मिस्त्री यांचे 1 लाख 28 हजार 625 शेअर आहेत. टाटा स्टील में टाटा सन्न्ची 29.75 टक्के भागीदारी आहे. तर सर्व प्रवर्तक व प्रवर्तक कंपन्यांची भागिदारी 31.35 टक्के आहे. बिगर प्रवर्तक भागधारक असलेल्या एलआयसीचे 5.11 टक्के शेअर आहेत.

Web Title: cyrus mistry resigns from 6 companies