‘डी-मार्ट’च्या आयपीओचा आज शेवटचा दिवस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली: अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स अर्थात डी-मार्टच्या प्राथमिक समभाग विक्रीचा(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) आज शेवटचा दिवस आहे. काल अर्थात दुसऱ्या दिवशी कंपनीच्या आयपीओला 2.5 पट अधिक प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या 11.31 कोटी शेअर्ससाठी निविदा दाखल झाल्या. कंपनीने केवळ 4.43 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते.

कंपनी आयपीओद्वारे तब्बल 1,800 कोटींचे भांडवल उभारणार आहे. कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी निधी वापरणार आहे. शिवाय यातून काही निधीचा उपयोग नवीन स्टोअर्स सुरू करण्यासाठी देखील करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीची 21 मार्च रोजी शेअर बाजारात नोंदणी होण्याची शक्यता आहे. डी-मार्टच्‍या शेअरची राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे. पीएनबी हाऊसिंग फायनान्सनंतर देशातील पहिलाच मोठा आयपीओ ठरणार आहे. कंपनीने 3,000 कोटींचा आयपीओ सादर केला होता.

Web Title: D-Mart operator Avenue Supermarts’ IPO oversubscribed 20 times