जमा नोटांची माहिती 30 जूननंतर मिळणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई : नोटाबंदीच्या 50 दिवसांच्या काळात जमा झालेल्या पाचशे व हजारच्या रद्द नोटांची आकडेवारी जमा करण्यात येत आहे. रद्द नोटा जमा करण्याच्या सर्व योजनांची मुदत 30 जूनला संपत असून, त्यानंतर ही माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी दिली.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी रद्द नोटा बॅंकांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुभा दिली होती. विदेशात असलेल्या भारतीयांना या नोटा जमा करण्यास 31 मार्चपर्यंत आणि अनिवासी भारतीयांसाठी 30 जूनपर्यंत मुदत आहे. याविषयी बोलताना रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा म्हणाले, ""सहकारी बॅंका तसेच, नेपाळ आणि भूतानमध्ये जमा रद्द नोटा आणि सर्व योजनांमध्ये 30 जूनपर्यंत जमा रद्द नोटा यांची आकडेवारी हाती आल्यानंतर नेमकी माहिती जाहीर करण्यता येईल. आता जेवढ्या रद्द नोटा जमा आहेत, त्यांची माहिती देता येऊ शकते. मात्र, अंतिम आकडेवारी जाहीर करण्यास काही अवधी लागणार आहे.''

"देशात 4 हजार ठिकाणी नोटा साठविल्या जातात. रिझर्व्ह बॅंकेकडून 19 ठिकाणी नोटा साठविल्या जातात. सर्व बॅंकांकडे 30 डिसेंबरनंतर जमा रद्द नोटांची माहिती रिझर्व्ह बॅंकेने मागविली आहे. या माहितीची तपासणी सुरू आहे. रद्द करण्यात आलेल्या नोटा अंदाजे 15.45 लाख कोटी रुपयांच्या होत्या आणि त्यांचे एकूण चलनात प्रमाण 86 टक्के होते. नोटाबंदीनंतर 9.92 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा वितरणात आणण्यात आल्या आहेत,'' असे त्यांनी नमूद केले.

Web Title: data on deposited note to release after 30 june