देशात महागाईचा भडका

Dearness
Dearness

नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्यपदार्थाचे दर गगनाला भिडल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात ५.१३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ही मागील दोन महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने सप्टेंबर महिन्यातील घाऊक चलनवाढीची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यानुसार, घाऊक चलनवाढीचा दर ५.१३ टक्‍क्‍यांवर गेला असून, ऑगस्ट महिन्यात तो ४.५३ टक्‍के तर, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो ३.१४ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या महागाईतील वाढ सप्टेंबरमध्ये ०.२१ टक्के आहे.   दरम्यान, गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये ३.७७ टक्‍क्‍यांवर गेल्याचे स्पष्ट झाले असून, ऑगस्टमध्ये तो ३.६९ टक्के होता.

इंधन, ऊर्जेतील चलनवाढ १६.६५ टक्के 
सप्टेंबर महिन्यात इंधन व ऊर्जेतील चलनवाढ १६.६५ टक्के राहिली. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर भडकल्याने गेल्या महिन्यात इंधनदरात मोठी वाढ झाली. त्यामुळे पेट्रोल व डिझेलमधील चलनवाढ अनुक्रमे १७.२१ व २२.१८ टक्‍क्‍यांवर पोचली. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरमधील चलनवाढीचा दर ३३.५१ टक्के राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com