कर्जवसुली थकलेलीच; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत एकूण ४,३२,५८४ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) जाहीर केली. यापैकी केवळ ४५,६५९ कोटी रुपयांची (१० टक्के) कर्जे वसूल होऊ शकली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत एकूण ४,३२,५८४ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) जाहीर केली. यापैकी केवळ ४५,६५९ कोटी रुपयांची (१० टक्के) कर्जे वसूल होऊ शकली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टेट बँकेने २०१२ ते २०२० या कालावधीत 
निर्लेखित केलेली कर्जे १.२३ कोटी रुपये 
वसूल केलेली कर्जे ८९६९ कोटी रुपये (७ टक्के)

मोठे थकबाकीदार – अलोक इंडस्ट्रीज, भूषण पॉवर अँड स्टील, आयआरव्हीसीएल, व्हिडिओकॉन. 

एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेने केलेला दावा - आघाडीच्या ५० थकबाकीदारांकडील रक्कम ६८,५०७ कोटी रुपये. यात नीरव मोदी, मेहुल चोक्सीसह अनेक उद्योगांची नावे, शिवाय ज्वेलरी उद्योगातील अनेकांची नावे या यादीत आहेत. याशिवाय, आयटी, पायाभूत सुविधा, ऊर्जा, औषध कंपन्या यांचाही यात समावेश आहे.

रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद २०१३ मध्ये स्वीकारल्यानंतर २०१४ च्या अखेरीपासून बँकांच्या थकीत कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांना कर्जाचा अंदाज घ्यायला सांगितला, जेव्हा आकडेवारी समोर आली ती राजन यांच्या अंदाजाच्या तीनपट किंवा त्याहून अधिक होती. त्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

अनुत्पादक मालमत्तेत टॉप १२ थकबाकीदारांचा वाटा - २५ टक्के. यातील चार जणांकडून ५२ टक्के रकमेची परतफेड केली गेली. ती ३,४५,००० कोटी रुपयांच्या केवळ १४ टक्के (४८,३०० कोटी रुपये) होती. म्हणजेच आठ कंपन्यांकडून येणारे तीन लाख कोटी रुपये तसेच राहिले, ही रक्कम दहा राज्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या दुप्पट आहे. 

देशातल्या ८८ मोठ्या कर्जदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना १.०७ लाख कोटी रुपयांच्या वसुलीला ठेंगा दाखवला आहे. त्यांची थकबाकी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt recovery is exhausting