औद्योगिक उत्पादनात घट

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

देशातील औद्योगिक उत्पादनात डिसेंबर महिन्यात ०.३ टक्‍क्‍याची घट झाली आहे. उत्पादन क्षेत्रातील घसरणीमुळे औद्योगिक उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये (आयआयपी) डिसेंबर २०१८ मध्ये २.५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली होती. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्रात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात १.२ टक्‍क्‍याची घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत उत्पादन क्षेत्रात २.९ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली होती.

नवी दिल्ली - देशातील औद्योगिक उत्पादनात डिसेंबर महिन्यात ०.३ टक्‍क्‍याची घट झाली आहे. उत्पादन क्षेत्रातील घसरणीमुळे औद्योगिक उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये (आयआयपी) डिसेंबर २०१८ मध्ये २.५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली होती. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्रात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात १.२ टक्‍क्‍याची घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत उत्पादन क्षेत्रात २.९ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिसेंबरमध्ये वीजनिर्मितीत ०.१ टक्‍क्‍याची घट झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये वीजनिर्मितीत ४.५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली होती. खाण उद्योगाचे उत्पादन डिसेंबरमध्ये ५.४ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ ०.५ टक्‍क्‍यांनी घटली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ४.७ टक्‍क्‍यांची वाढ औद्योगिक उत्पादन निर्देशांकात नोंदविण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in industrial production