नोटाबंदीचा वाहन उद्योगाला 8000 कोटींचा फटका

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

नोटाबंदीमुळे वाहनविक्रीचा वेग कमी झाला. आता हा वेग पूर्वपदावर येण्यास वेळ लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात अनिश्‍चितता समोर असून, यात आगामी वस्तू व सेवाकराचाही (जीएसटी) समावेश आहे.
- पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्र अँड महिंद्र

नवी दिल्ली : भारतातील वाहननिर्मिती आणि ट्रॅक्‍टर क्षेत्राला नोटाबंदीमुळे तब्बल 8 हजार कोटी रुपयांचा महसुली फटका बसला आहे, अशी माहिती महिंद्र आणि महिंद्र कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी गुरुवारी दिली.

गोएंका म्हणाले, "गेल्या वर्षी वाहनविक्रीचा वेग सणासुदीमुळे सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्यांत चांगला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीमुळे हा वेग ठप्प झाला. आम्ही केलेल्या गणिताप्रमाणे वाहननिर्मिती आणि ट्रॅक्‍टर व्यवसायाला यामुळे 8 हजार कोटींचा महसुली फटका बसला आहे.

सरकारने ऑक्‍टोबरनंतर विकासदर वाढल्याचे म्हटले आहे. असे असताना मात्र, वाहननिर्मिती क्षेत्राच्या महसुलात 10 टक्के घट झाली आहे, याचाही विचार करावा लागेल.''

पवन गोएंका पुढे म्हणाले, "नोटाबंदीमुळे वाहनविक्रीचा वेग कमी झाला. आता हा वेग पूर्वपदावर येण्यास वेळ लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात अनिश्‍चितता समोर असून, यात आगामी वस्तू व सेवाकराचाही (जीएसटी) समावेश आहे."

Web Title: demonetisation 8000 crore setback to auto industry