'उर्जित पटेलांनी राजीनामा द्यावा'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 60 वर पोहोचला आहे. यातील बर्‍याच लोकांना नोटाबंदीमुळे आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे देशभरात लोकांची बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी झुंबड उडाली. यामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) केली आहे.

सध्याचे गव्हर्नर पटेल यांनी कुठलेही आर्थिक नियोजन न करता बहुसंख्य लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 60 वर पोहोचला आहे. यातील बर्‍याच लोकांना नोटाबंदीमुळे आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच बँकेत रांगेत उभे असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही अधिक आहे. शिवाय पाचशे आणि हजाराच्या जुन्याच नोटा असल्याने रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत.

Web Title: Demonetisation: Bank officers union calls for Urjit Patel's resignation; focus on RBI's role