जुन्या नोटा बाळगणारांना पन्नास हजारांपर्यंत दंड

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना पन्नास हजार रुपये दंड किंवा जप्त रकमेच्या पाच पटीने जास्त रक्कम यापैकी जी जास्त रक्कम असेल तितका दंड आकारला जाईल. यासंबंधीच्या तक्रारींवर दंडआकारणीचे अधिकार महापालिका दंडाधिकाऱ्यांना असणार आहेत.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाला 45 दिवस उलटून गेल्यानंतर आता केंद्र सरकार बंदी घातलेल्या जुन्या नोटांच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी नवा अध्यादेश काढणार असल्याचा अंदाज आहे.

त्यानुसार पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा बाळगणे, स्वीकारणे अथवा पाठविणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार केंद्र सरकार लवकरच याबाबतचे अध्यादेश काढणार आहे.

जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना पन्नास हजार रुपये दंड किंवा जप्त रकमेच्या पाच पटीने जास्त रक्कम यापैकी जी जास्त रक्कम असेल तितका दंड आकारला जाईल. यासंबंधीच्या तक्रारींवर दंडआकारणीचे अधिकार महापालिका दंडाधिकाऱ्यांना असणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशींनुसार अध्यादेशाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. नोटा बदलण्यासाठीची शेवटची तारीख 30 डिसेंबर असून, त्यानंतर येणाऱ्या जुन्या नोटा थेट रिझर्व्ह बॅंकेत जमा करता येणार आहेत.

Web Title: Demonetisation: Rs 50,000 as penalty for possessing old notes after Dec 30