"नोटाबंदीमुळे आर्थिक विषमतेत भरच पडली"

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

दावोस : श्रीमंत आणि गरीब यांच्यात जगातील सर्वांत मोठी आर्थिक दरी भारतात आहे. तसेच, नोटाबंदीमुळे ही विषमता वाढतच आहे, असे निरीक्षण ऑक्सफॅमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशा अग्रवाल यांनी नोंदविले आहे. 

देशातील गरीब-श्रीमंत आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंदावत चालली आहे. देशातील 57 अब्जाधीशांकडे 70 टक्के संपत्ती एकवटली असून, तेच ही संपत्ती नियंत्रित करीत आहेत, असे सांगून अग्रवाल म्हणाल्या, नोटाबंदीमुळे दीर्घकालीन असा कोणताही फायदा नाही. याउलट त्यामुळे आर्थिक विषमतेत भरच पडली आहे. 
इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अग्रवाल यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. 

रशियानंतर भारतात सर्वाधिक आर्थिक विषमता आहे, तसेच जगातील 50 टक्के संपत्ती एक टक्का श्रीमंतांकडे एकवटली आहे असे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वार्षिक बैठकीआधी प्रसिद्ध झालेल्या 'ऑक्सफॅम' अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात सध्या रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतील 57 अब्जाधीशांकडे 216 अब्ज डॉलरची संपत्ती असून ही देशातील एकूण संपत्तीच्या 70 टक्के इतकी आहे. जगातील 8 अब्जाधीशांकडे 50 टक्के गरीबांच्या संपत्तीइतकी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 19.3 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. त्यापाठोपाठ सनफार्माचे दिलीप संघवी यांचा क्रमांक लागतो. संघवी यांच्याकडे 16.7 अब्ज डॉलर्सची तर विप्रो समूहाचे अझीम प्रेमजी यांच्याकडे 15 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.

संपूर्ण जगभरात 255.7 लाख कोटी डॉलर्स इतकी संपत्ती आहे, असे ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे. 'अॅन इकॉनॉमी फॉर 99 परसेन्ट' असे नाव असलेल्या या अहवालात प्रत्येक व्यक्तीला फायदा होईल, अशी जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2015 नंतर जागतिक पातळीवर आर्थिक विषमतेची दरी रुंदावत आहे.

जागतिक पातळीवर सर्वात श्रीमंत व्यक्ती

  1. बिल गेट्स (मायक्रोसॉफ्ट) : 75 अब्ज डॉलर्स संपत्ती
  2. अमान्सिओ ऑर्तेगा : 67 अब्ज डॉलर्स
  3. वॉरेन बफे : 60.8 अब्ज डॉलर्स

Web Title: demonetization aggravated unequal economy