कर्जबुडव्यांच्या शोधासाठी गुप्तहेर 

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नवी दिल्ली - कर्ज गैरव्यवहारामध्ये अडकलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) बेपत्ता कर्जबुडव्यांच्या शोधासाठी गुप्तहेर नेमण्याची पावले उचलली आहेत. यासाठी खासगी गुप्तहेर संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले. ‘पीएनबी’वरील थकीत कर्जांचा बोजा डिसेंबरअखेर ५७ हजार ५१९ कोटी रुपयांवर पोचला आहे. 

‘पीएनबी’ने खासगी गुप्तहेर संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक संस्थांना ५ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत बॅंकेने दिली आहे. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी बॅंकेने हे पाऊल उचलले असून, बेपत्ता कर्जबुडव्यांचा शोध या गुप्तहेर संस्था करतील. सर्व थकीत कर्ज खाती या संस्थाकडे दिली जातील आणि कर्जदारांचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाईल.

याचबरोबर थकीत कर्ज वसुलीसाठी ‘पीएनबी’ने ‘गांधीगिरी’चा अवलंब केला आहे. कर्ज थकीत असलेल्या कर्जदारांने नाव जाहीर करण्याची मोहीम बॅंकेने सुरू केली आहे. यातून दरमहा १५० कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसूल करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांचा समावेश असलेल्या १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या गैरव्यवहारात बॅंक अडचणीत सापडली आहे. 

कर्जदाराला शोधण्यासाठी ६० दिवस 
खासगी गुप्तहेर संस्थांना कर्जदाराचा सध्याचा पत्ता, व्यवसाय, उत्पन्न, मालमत्तेचे तपशील हे मिळवून अहवाल सादर करण्यासाठी कमाल ६० दिवसांचा अवधी दिला जाईल. प्रकरण मोठे आणि गुंतागुंतीचे असल्यास ही मुदत वाढवून ९० दिवस करण्यात येणार आहे.

‘पीएनबी’चे थकीत कर्ज  (डिसेंबर 2017 अखेर)

५७,५१९कोटी रुपये

Web Title: Detective for the Search for Lies PNB