‘Bitcoin’ संदर्भात तुमचे मत सरकारला कळवले का?

Did you tell your opinion about 'Bitcoin'?
Did you tell your opinion about 'Bitcoin'?

नवी दिल्ली: आभासी चलन म्हणजेच बिटकॉइनच्या (व्हर्च्युअल किंवा डिजिटल / क्रिप्टो चलन) संदर्भात सरकारने जनतेकडून मत-मतांतरे मागवली आहेत. केंद्र सरकारने आता 31 मे 2017 पर्यंत व्हर्च्युअल म्हणजेच बिटकॉइनच्या संदर्भात सूचना आणि प्रस्ताव मागवले आहेत.

सध्या जगभरासह भारतात देखील व्हर्च्युअल म्हणजेच बिटकॉइनच्या साह्याने देशात व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांना देशात नियमित करण्यात यावे का? या संदर्भात सरकारकडून मते मागावण्यात आली आहेत. सध्या मोदी सरकारने डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

आरबीआयने नुकतेच भारतात बिटकॉइनचा वापर करणार्‍या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यात जगभरातील व्हर्च्युअल चलनांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. भारतात देखील काही अॅपने ऑनलाइन आणि मोबाईलच्या माध्यमातून बिटकॉइनचे हस्तांतरण करण्याची सोय देऊ केली आहे. झेबपे या अॅपने बिटकॉइनचे हस्तांतरण मोबाइलच्या साह्याने करण्याची सुविधा दिली आहे. अँड्रॉइड प्रणालीच्या साह्याने हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. झेबपेचे दररोज 2500 वापरकर्ते वाढत असून आतापर्यंत पाच लाख डाउनलोड्स झाले आहेत.

गेल्या वर्षभरात बिटकॉइनच्या मूल्यात तिप्पत वाढ झाली आहे. चालू वर्षात एका बिटकॉइनने 1,400 डॉलर्सची उच्चांकी पातळी गाठली आहे. जपानने बिटकॉइनच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिल्या नंतर बिटकॉइनच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com