पेट्रोलपेक्षा डिझेल महाग...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

चालू महिन्यात 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत 91.34 रुपयांवर पोचलेले पेट्रोल आणि 80.10 रुपयांवर पोचलेले डिझेलचे दर आता मात्र खाली येताना दिसत आहेत. इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 5 रुपयांची सवलत देऊन देखील मागच्या आठवड्यापर्यंत प्रामुख्याने डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात घट झाल्याने सलग पाचव्या दिवशी मुंबईसह देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 86 रुपये 91 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 78 रुपये 54 पैशांवर आले.

मागील आठवड्यात गुरुवारपासून पेट्रोलचे दर खाली येत आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबईत पेट्रोलचे दर एकूण 1 रुपये 39 पैसे तर डिझेलचे दर 78 पैशांनी कमी झाले आहेत.

ओडिशात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग 

देशातील बहुतेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर डिझेलच्या तुलनेत नेहमीच जास्त असतात. मात्र, ओडिशा हे राज्य याला अपवाद ठरले आहे. ओडिशात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. आजही देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. पण ओडिशातील भुवनेश्वरमध्ये पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर डिझेलसाठी 13 पैसे जास्त मोजावे लागत आहे. सोमवारी भुवनेश्वरमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर 80.27 पैसे आहे तर प्रतिलिटर डिझेलसाठी 80.40 पैसे मोजावे लागत आहेत. ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दल आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने डिझेलच्या या दरवाढीसाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diesel is costlier than petrol in Odisha