
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे निमित्त करून केंद्राने आज सलग १८व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तर डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाल्याचे इतिहासात पहिल्यांदाच दिसून आले आहे.
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे निमित्त करून केंद्राने आज सलग १८व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तर डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाल्याचे इतिहासात पहिल्यांदाच दिसून आले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिल्लीत डिझेलचे दर देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा आज जास्त झाले आहेत. दिल्लीत आज डिझेल प्रतिलिटर ०.४८ पैसे महाग होऊन ते ७९.८८ रुपये इतके झाले. पेट्रोलची किंमत ७९.७६ रुपये प्रति लीटर झाली आहे.
मागच्या १८ दिवसांच्या दरवाढीत डिझेल १०.४८ रुपये तर पेट्रोल ८.५० रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोलियम पदार्थांचे दर २०१४ पासून नियंत्रणमुक्त करण्यात आले. मोदी सरकारने ते रोजच्या रोज बदलण्याचा प्रघात पाडला.
एअर इंडियाच्या विमान सेवेला लाल झेंडा; अमेरिकेच्या डीओटीकडून नाराजी
दिल्लीत आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७९.७६ रुपये इतके स्थिर होते. मात्र डिझेलचे दर त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रतिलिटर ७९.८८ इतके झाले. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले, असे मानले जाते. पेट्रोलपेक्षा डिझेल स्वस्त असण्याचे एक ठळक कारण हे असते की पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर राज्य सरकारे कमी कर आकारतात.
सहकारी बँकांबद्दल मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
पेट्रोल व डिझेलचे अनुक्रमे दर (रुपयांत)
दिल्ली
७९.७६
७९.८८
मुंबई
८१.४५
७८.२२
कोलकता
८६.५४
७५.०६
चेन्नई
८३.०४
७७.१७