'डिजिटल वेल्थ चेक अप कॅम्प'चे 'सकाळ मनी'कडून आयोजन

'डिजिटल वेल्थ चेक अप कॅम्प'चे 'सकाळ मनी'कडून आयोजन

पुणे : 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहिले पाहिजे आणि 'सोशल डिस्टन्सिंग' पाळले पाहिजे. मात्र, तुम्हाला 'पर्सनल फायनान्स'चे योग्य नियोजन करण्याची हीच वेळ आहे. 

'सकाळ मनी'ने आता 'डिजिटल वेल्थ चेक अप कॅम्प'चे आयोजन केले आहे. या उपक्रमाअंतर्गत  "सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर' (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल तसेच, सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत.  

'सकाळ मनी'ने आयोजित केलेल्या या डिजिटल उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शन मिळेल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी 7447450123 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर मेसेजद्वारे एक लिंक प्राप्त होईल. त्यामध्ये माहिती भरल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी झाल्यानंतर तज्ज्ञ आपल्याशी संपर्क साधून निश्चित वेळ ठरवून डिजिटल माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शन करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com