‘डिविस लॅब्स’चा शेअर वर्षभराच्या नीचांकी पातळीवर…

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई: डिविस लॅब्सचा शेअर आज(सोमवार) 52 आठवड्यांची नीचांकी पातळीवर पोचला आहे. कंपनीला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) 'वॉर्निंग लेटर' मिळाल्याने शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्यानंतर, कंपनीच्या शेअरने 607 रुपयांवर नीचांकी पातळी गाठली.

औषधनिर्मिती कंपनी डिविस लॅब्सच्या विशाखापट्टणम प्रकल्पाला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) 'वॉर्निंग लेटर' मिळाले आहे. डिविसच्या या प्रकल्पातील युनिट-II साठी हे लेटर जारी करण्यात आल्याचे कंपनीने शेअर बाजारात सांगितले आहे. कंपनीने यासंदर्भातील तज्ज्ञ मंडळींसोबत चर्चा करुन लवकरच नियमांची पुर्तता करण्याची तयारी सुरु केली आहे. परंतु कंपनीने या लेटरचा इतर तपशील कंपनीने उघड केलेला नाही. याआधी मार्चमध्ये युएसएफडीएने कंपनीला याच युनिटसंदर्भात इशारा पत्रक(इम्पोर्ट अलर्ट) जारी केले होते.

मुंबई शेअर बाजारात डिविस लॅब्सचा शेअर सध्या(12 वाजून 20 मिनिटे) 630.25 रुपयांवर व्यवहार करत असून 0.14 टक्क्याने घसरला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 607.00 रुपयांची नीचांकी तर 1380.00 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 16,737.79 कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

Web Title: divislab share price collapse