...तरी काळ्या पैशावर अंकुश लागणार नाही - रघुराम राजन

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या तरी चलाख लोक यापासून वाचण्यासाठी मोठ्या नोटांच्या माध्यमातून सोने खरेदी करू शकतात. अशांना पकडणे खूपच अवघड आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. 

नोटा रद्द करण्याऐवजी भारतीय करव्यवस्था सुधारण्यावर भर देणे आवश्‍यक असल्याचे राजन यांचे मत आहे. अमेरिकेत अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३९ टक्के इतका कर बसतो. त्याशिवाय तेथील वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे कर आहेत; तर भारतात हेच दर कमाल ३३ टक्के इतके आहे. आपल्याकडे जगातील इतर औद्योगिक देशांपेक्षा कर कमी असल्याचे राजन यांनी म्हटले होते.

काळा पैसा बाळगणाऱ्यांबाबत ते म्हणाले, की लोकांच्या देवाण-घेवाणीवर लक्ष ठेवणे आणि जेथे लोक आपले उत्पन्न घोषित करत नाहीत तेथे चांगली करप्रणाली लागू केली जावी. माझ्या मते आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसे लपवणे कठीण नाही.

बेहिशेबी संपत्ती घटेल - रंगराजन
केंद्र सरकारने नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेत असलेला काळा पैसा आणि बेहिशेबी संपत्तीचे प्रमाण नक्की घटेल, असा विश्वास रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतल्यामुळे निश्‍चितपणे काही अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र, काही दिवसांतच या अडचणी दूर होतील. या परिस्थितीमुळे एक चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे, लोक रोख रकमेशिवाय चलनाच्या अन्य पर्यायांचा विचार करू लागलेत. ही एक सुवर्णसंधी असून, त्याचा फायदा उठवणे गरजेचे असल्याचेही रंगराजन यांनी सांगितले.

Web Title: do not have to curb black money