डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला

पीटीआय
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी २४ पैशांची घसरण होऊन ६९.८६ या पातळीवर बंद झाला. आयातदारांकडून डॉलरला मागणी वाढल्याचा फटका आज रुपयाला बसला. 

अमेरिकेतील सकारात्मक आर्थिक आकडेवारीमुळे जगभरातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर आज वधारला. परकी निधीचा वाढलेला ओघ आणि शेअर बाजारातील तेजीचे वारे यामुळे रुपयातील घसरण काही प्रमाणात रोखली गेली. तो अखेर मागील सत्राच्या तुलनेत २४ पैशांची घसरण होऊन ६९.८६ या पातळीवर बंद झाला. काल (ता. २३) रुपया ५ पैशांनी वधारून ६९.६२ या पातळीवर बंद झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dollar Rupees