आता माघार नाही- ट्रम्प

पीटीआय
मंगळवार, 3 जुलै 2018

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धात मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. याविषयी तोडगा काढण्यात उभय देशांना अपयश आले तर, लवकरच चीनकडून आयात होणाऱ्या सुमारे ५०० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा करआकरणी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

चीनकडून आयात होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर अमेरिकेने यापूर्वीच २५ टक्के शुल्क आकारणी केली आहे. त्याला चीननेही जशास तसे उत्तर दिले आहे. चीनने आपला हेकेखोरपणा सोडला नाही तर, आणखी २०० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर शुल्क आकारले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. हे सर्व होऊ नये असे चीनला वाटते. त्यामुळे ते आवश्‍य तडजोडीचे प्रयत्न करतील. ही तडजोड अमेरिकेच्या हितावह असेल तर, त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, असेही ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

हार्ले डेव्हिडसनला बसणार फटका
हार्ले डेव्हिडसन या कंपनीने आपल्या दुचाकींचे उत्पादन परदेशात सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसेल, अशी शक्‍यता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. कंपनीच्या दुचाकींची अमेरिकेत असणारी लोकप्रियताही यामुळे घटू शकते, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. 

Web Title: donald trump business war