‘डॉ. रेड्डीज्’च्या शेअरने गाठला तळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई: डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीजच्या शेअरने आज(गुरुवार) तब्बल 31 महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने(युएसएफडीए) कंपनीच्या दुव्वाडा(आंध्रप्रदेश) प्रकल्पाच्या तपासणीअखेर तब्बल 13 निरीक्षणे नोंदवित कंपनीला "फॉर्म 483' जारी केला आहे. यासंबंधी घोषणेनंतर कंपनीच्या शेअरने सुमारे 5 टक्के घसरणीसह 2720 रुपयांवर नीचांकी पातळी गाठली आहे.

"आमच्या दुव्वाडा, विशाखापट्टणम येथील उत्पादन प्रकल्पाची तपासणी 8 मार्च रोजी पुर्ण झाली आहे. आम्हाला 13 निरीक्षणांसह फॉर्म 483 जारी करण्यात आला आहे.", असे डॉ. रेड्डीजने शेअर बाजारात कळविले आहे. परंतु नेमक्या कोणत्या प्रक्रियांविषयी ही निरीक्षणे नोंदविण्यात आली हे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत काही त्रुटी आढळून आल्यास युएसफडीएकडून 483 फॉर्म जारी केला जातो.

मुंबई शेअर बाजारात डॉ. रेड्डीजचा शेअर आज(गुरुवार) 2800 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 2720 रुपयांवर दिवसभराची तसेच 52 आठवड्यांची नीचांकी तर 2800 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या(11 वाजून 53 मिनिटे) कंपनीचा शेअर 2727.85 रुपयांवर व्यवहार करत असून 4.33 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: dr. reddys shares down