निर्गुंतवणूकीसंबंधी चर्चेनंतर ‘ड्रेजिंग कॉर्पोरेशन’ उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई: केंद्र सरकार ड्रेजिंग कॉर्पोरेशनमध्ये निर्गुंतवणूकीचा विचार करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज(सोमवार) कंपनीच्या शेअरने 16 टक्के वाढीसह 519 रुपयांवर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

केंद्र सरकार ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील 51 टक्के हिस्सेदारीची विक्री करण्याचा विचार करीत आहे. याविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक प्रस्ताव तयार केला असून यावर प्रमुख मंत्र्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. या बातमीसंदर्भात मुंबई शेअर बाजाराने कंपनीकडे स्पष्टीकरण मागविले आहे.

ड्रेजिंग कॉर्पोरेशन ही सरकारची 'मिनीरत्न' कंपनी आहे. डिसेंबरअखेर उपलब्ध आकडेवारीनुसार कंपनीतील सरकारी हिस्सेदारीचे प्रमाण 73.47 टक्केएवढे आहे.

मुंबई शेअर बाजारात ड्रेजिंग कॉर्पोरेशनचा शेअर आज(सोमवार) 494 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 481.55 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 518.80 रुपयांवर दिवसभराची तसेच 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 2 मिनिटे) 484.85 रुपयांवर व्यवहार करत असून 39.35 रुपये अर्थात 8.83 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: Dredging Corp up over 15% on reports of govt stake sale