लॉकडाउनमुळे गाडी बंद पडलीय?; टेन्शन घेऊ नका, 'ड्रूम'ने सुरू केलीय घरपोच वाहन दुरुस्ती सेवा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

भारतात सुमारे ५ ते २५ दशलक्ष वाहने सुरु होण्यास किंवा जागेवरून हलण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

मुंबई : लॉकडाउनमुळे बराच काळ वाहने एकाच जागेवर उभी आहेत. अशात डेड बॅटरी, इंधन पंप गळती, इग्निशन इश्यू, फॅलॅट टायर्स आदी समस्या उद्भवू शकतात. लॉकडाऊन संपल्यावर आपले वाहन सुरु करताना मालकांना अशा आव्हानांचा सामना करायला लागू शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही समस्या सोडवण्यासाठी भारतातील सर्वात मोठा आणि अग्रेसर ऑनलाइन ऑटोमोबाइल ट्रान्सपोर्ट मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी जम्पस्टार्ट-ऑटोकेअर नावाची एक अनोखी घरपोच) सेवा सुरू केली आहे. या सेवेत टायर्सची देखभाल, महत्त्वाच्या भागांची तपासणी, ऑइल व लुब्रिकंट टॉप अपसह वाहनांच्या जम्पस्टार्टचा समावेश आहे.

- 'कर्जमाफीचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना...'; उपमुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली 'ही' मागणी!

मुख्य जम्पस्टार्ट डिव्हाइस पॅकेजसह यूझर टोइंग, गॅस फिल, फ्लॅट टायरची दुरूस्ती, प्रेशर वॉटर क्लीनिंग आणि ऑइल, ल्यूब्रिकंट, कूलंट इत्यादीसाठी टॉप अप सेवांचा लाभ घेता येईल. यूझर्सना वाहन, लोकेशन, मेन सर्व्हिस आणि या प्रक्रियेत कोणत्याही अॅड ऑन सेवांची निवड करता येऊ शकते.

- अरे बापरे! एक नव्हे, दोन नव्हे तर भारताच्या १०० पट जास्त कोरोनाचा कहर अमेरिकेत!

ते आपल्या सोयीनुसार, टाइम स्लॉट निवडू शकतात आणि पेमेंटची हमी देऊन नंतरही पेमेंट करू शकतात. त्यानंतर ड्रूम हे काम करण्यासाठी एक ‘इको-निंजा’ किंवा तंत्रज्ञ नियुक्त करते. हा तंत्रज्ञ सर्व्हिसिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्राहकाला इको जम्प स्टार्ट रिपोर्ट देतो. ग्राहक ऐनवेळी तंत्रज्ञाला निश्चित केलेल्या पॅकेजमध्ये आणखी अतिरिक्त सेवा देण्यासही सांगू शकतो.

- पुणेकरांसाठी मोठी बातमी : दुकानांच्या वेळांबाबत पुन्हा नवीन आदेश

ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले, ‘‘लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर एका अंदाजानुसार, भारतात सुमारे ५ ते २५ दशलक्ष वाहने सुरु होण्यास किंवा जागेवरून हलण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

या सुविधेचा फायदा ग्राहकांना आपली वाहने सुरु करताना होऊ शकतो. आमच्या ग्राहकांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी मार्च महिन्यात आम्ही जर्म शील्ड लाँच केले. तसेच येत्या काळात अशाच प्रकारे अनोखी सेवा देणार आहोत.”

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Droom launches Jumpstart a Doorstep servicing for vehicles post Lockdown