निकालांमुळे डॉ. रेड्डीज् लॅब्सच्या शेअरमध्ये 3 टक्के घसरण

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई: डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीजचा शेअर आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात 3 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीच्या आर्थिक निकालांनी शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरले आहेत. परिणामी, आज कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. कंपनीने शनिवारी तिमाही निकालांची घोषणा केली होती.

डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 15.94 टक्क्यांनी घसरुन 492.3 कोटी रुपयांवर पोचला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान, कंपनीने 3,653.4 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अगोदरच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीने 3,910 कोटी रुपयांची विक्री केली होती.

मुंबई शेअर बाजारात डॉ. रेड्डीज् लॅब्सचा शेअर 3171 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 3049.70 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 3175 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठी. सध्या(11 वाजून 18 मिनिटे) कंपनीचा शेअर 3126.00 रुपयांवर व्यवहार करत असून 15.60 रुपये अर्थात 0.50 टक्क्याने घसरला आहे.

Web Title: dr.reddyes share down after result