'एटीएम' सेवा पूर्ववत होण्यासाठी आठवडा लागणार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई: अपुऱ्या चलन पुरवठ्याने ठप्प झालेली एटीएम सेवा पूर्ववत होण्यास आठवडाभराचा कालावधी जाण्याची शक्‍यता आहे. पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध होत नसल्याने बॅंकांकडून "एटीएम"मध्ये ऐवजी शाखेत कॅश ठेवण्याला प्राधान्य दिले जात आहे. परिणामी ग्राहकांनी कॅश काउंटरवरून रोख घेण्याचे आवाहन बॅंकांनी केले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच चलन तुटवडा निर्माण झाल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बॅंका आणि रिझर्व्ह बॅंकेतील मतभेदांमुळे ग्राहकांना मात्र पैसे काढण्यासाठी उन्हाचे चटके सहन करत वणवण भटकावे लागत आहे.

रिझर्व्ह बॅंके रोकड पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला असला तरी बॅंकांनी तो फेटाळून आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून चलन पुरवठा कमी होत गेला. आता तर गेल्या आठवडाभरापासून मागणीच्या तुलनेत निम्म्याहून कमी रक्कम आरबीआयकडून प्राप्त होत असल्याचे खासगी क्षेत्रातील एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले. ग्राहकांनी रोख रकमेसाठी शाखेत दरम्यान, एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनीदेखील रोख रकमेचा पुरवठा कमी होत असल्याचे मान्य केले आहे. फेब्रुवारीअखेर बॅंकिंग यंत्रणा नोटाबंदीतून सावरली होती. प्रत्येक एटीएमसाठी दर दोन ते तीन दिवसांनी 18 ते 20 लाखांचा भरणा केला जात होता, मात्र आता हे प्रमाण तीन ते पाच लाखांपर्यंत कमी झाले आहे. त्यातच पैसे काढण्याची मर्यादा शिथिल केल्याने जेमतेम पाच ते 10 ग्राहकांना "एटीएम"मधील पैसे उपलब्ध होतात, त्यानंतर दिवसभर एटीएम कोरडेठाक असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बॅंकांच्या करन्सी चेस्टमधून चलन पुरवठा वाढवण्यावर भर दिला जात असून आठवडाभरात चलन उपलब्धता वाढेल, असा विश्‍वास आरबीआयमधील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. दरम्यान इतर राज्यांमध्ये चलन पुरवठा सुरळीत असून केवळ महाराष्ट्रात टंचाई निर्माण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

चलन टंचाईवर अशी मात करा

  • शक्‍यतो कॅशलेस व्यवहार करा
  • पैसे काढण्यासाठी बॅंकेच्या शाखेत जाणे सोयीस्कर
  • बॅंक शाखांमधील एटीएममध्ये दररोज काही प्रमाणात रोकड भरणा, त्यामुळे शाखांमधील एटीएममध्ये सकाळच्या वेळेत पैसे मिळू शकतील

Web Title: e payment money bank ATM