मंदीच्या काळात 'इथे' मिळतील भरपूर 'रिटर्न्स'

टीम ईसकाळ
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

निवृत्तीनंतर आरामात आयुष्य व्यतीत करता यावे आणि तुमच्या कुटुंबियांना सुरक्षित आयुष्य मिळावे याकरिता तुम्ही दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही स्वरूपातील आर्थिक उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत.

पुणे: निवृत्तीनंतर आरामात आयुष्य व्यतीत करता यावे आणि तुमच्या कुटुंबियांना सुरक्षित आयुष्य मिळावे याकरिता तुम्ही दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही स्वरूपातील आर्थिक उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टांमध्ये नवीन कार विकत घेणे किंवा परदेशी सहलीवर जाणे समाविष्ट असू शकेल. तर दीर्घकालीन उद्दिष्टात तुमच्या बालकाचे उच्च शिक्षण आणि निवृत्तीकरिता जमापुंजी साठविणे अशाप्रकारच्या उद्दिष्टांचा समावेश असू शकतो. तुमच्या अनेक ध्येयांकरिता संपत्ती जमा करण्यासाठी नियोजन अतिशय महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे तुम्ही निवडणार असलेल्या गुंतवणुकीचा प्रकारही महत्त्वपूर्ण ठरतो. 

ही दोन्ही स्वरुपाची म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय गाठण्याचा एक मार्ग म्हणजे फिक्स डिपॉझीटमध्ये (मुदत ठेव)  गुंतवणूक करणे. कारण याप्रकारची ठेव कोणत्याही बाजाराशी जोडलेली नसते, त्यामुळे खात्रीशीर परताव्याची हमी राहते. उदाहरणार्थ, Bajaj Finance Fixed Deposit चांगल्या परतावा देत असल्याने जोखीम टाळण्याच्या दृष्टीने आणि संपत्ती वाढविण्याच्या दृष्टीने चांगले आहे. याप्रकारच्या ठेवीला 'आयसीआरए', 'क्रिसील' आणि 'एसअँडपी ग्लोबल'ची उच्च स्थिरता आणि विश्वासार्ह मानांकन लाभले आहे. फिक्स डिपॉझीटच्या मदतीने आर्थिक ध्येय चांगल्या प्रकारे गाठता येतील. 

खात्रीशीर परताव्यासह निश्चित वेळेत तुमची ध्येय गाठा 
तुम्हाला मिळणारा परतावा हा बाजारातील अस्थिरतेच्या प्रभावाखाली नसल्याने तसेच व्याजदर या कालावधी दरम्यान स्थिर असल्याने जेव्हा तुम्ही फिक्स डिपॉझीटमध्ये रक्कम गुंतवता त्यावेळी तुमचे उत्पन्न निश्चित असते. तुमची गुंतवणूक एका ठराविक कालावधीकरिता किती उत्पन्न देईल याची आकडेमोड करू शकता व त्यानुसार तुमच्या उद्दिष्टांनुरूप तुमच्या गुंतवणुकीची रूपरेषा आखता येते. उदाहरणार्थ, बजाज फायनान्सच्या वतीने नियमित ग्राहकांसाठी 8.35 टक्क्यांचा दर निश्चित करण्यात आला असून वरिष्ठ नागरिकांना 8.70 टक्के दराने व्याज देण्यात येते. त्यामुळे FD calculator चा देखील वापर करून किती कालावधीकरिता तुमची गुंतवणूक कितपत उत्पन्न देईल हे निश्चित कळू शकते. तुमच्या ध्येयासाठी पुरेशी रक्कम जमा होईल याची खातरजमा राहते.

तुमच्या उद्दिष्टांनुसार ठराविक कालावधीकरिता गुंतवणूक करा
 तुमचे उद्दिष्ट अल्पकालीन असो किंवा दीर्घकालीन, त्याच्या प्रकारानुसार तुम्ही साजेसा गुंतवणूक कालावधी निवडू शकता. उदाहरणार्थ, 'बजाज फिनसर्व्ह'सह तुम्ही 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. एकाच साधनाच्या मदतीने तुम्ही विविध उद्दिष्ट गाठू शकता. त्याचप्रमाणे 'एफडी' करताना  'ऑटो-रिन्युअल'चा लाभ देखील घेता येतो. जेणेकरून गुंतवणूक परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अर्ज किंवा अतिरिक्त दस्तऐवज दाखल करण्याची गरज राहत नाही. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टांकरिता अतिरिक्त मेहनतीशिवाय संपत्ती जमवू शकता.

तरीच, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करताना लक्षात असू द्या. ज्यावेळी कालावधी 36 महिने किंवा त्याहून अधिक असतो, तेव्हा 'एफडी'वर मिळणाऱ्या व्याजाची रक्कमही अधिक असते. तुम्ही तुमचे उद्दिष्ट कसे गाठू शकता हे पाहण्यासाठी खालील तक्ता पहा. जेव्हा तुम्ही 'बजाज फायनान्स' एफडीमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता तेव्हा मिळणारे उत्पन्न कशाप्रकारचे असते ते जाणून घ्या.

No photo description available.

तुमची संपत्ती स्मार्टपणे वाढावी म्हणून 'मल्टी-डिपॉझीट' सुविधेमार्फत गुंतवणूक करा
बजाज फायनान्सच्या वतीने 'मल्टी-डिपॉझीट' सुविधा उपलब्ध करून देण्यात येते, ज्याद्वारे तुम्हाला काही एफडी वेगवेगळ्या व्याजदर, रक्कम आणि कालावधी एकच धनादेश (सिंगल चेक) देऊन निवडता येतो.  तुमच्या उद्दिष्टांकरिता पुरेसा रोखप्रवाह राहील याची खातरजमा राहते. जेव्हा तुम्हाला काही ध्येयांकरिता गुंतवणूक करायची असते, त्यावेळी ही सुविधा आदर्श ठरते. कारण प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्ही वेगळी 'एफडी' करू शकता, तसेच रक्कम परिपक्व होण्याआधी ती काढून घेण्याची गरजही संपते. शिवाय, एखादवेळी काही अघटीत प्रसंगामुळे एफडी तोडण्याची वेळ आल्यास तुम्ही इतर एफडीना हात लावता एखादी एफडी तोडू शकता.

एखाद वेळेस अनिश्चितता उदभवल्यास तत्काळ कर्ज सुविधेचा लाभ
अनेकदा वैद्यकीय खर्चासारखे काही अनिश्चित प्रसंग उद्बवल्यास आर्थिक गरजांचा निश्चित अंदाज बांधता येत नाही. अशावेळी तुमचे प्रयत्न तोकडे पडणार नाही त्यानुसार नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. आपतकालीन स्थिती ओढवल्यास तुम्हाला विशिष्ट ध्येयासाठी केलेली 'एफडी' मोडण्याची गरज नाही. तर तुम्ही एफडीवर कर्ज घेऊ शकता. तुम्ही तातडीच्या निकडीसाठी. 4 लाख रुपयांपर्यतचे त्वरीत कर्ज घेऊ शकता. अशाप्रकारे तुमच्या उद्दिष्टाकरिता संपत्ती जमवता येईल.

ही सर्व वैशिष्ट्ये नक्कीच तुमच्या आर्थिक ध्येयांना साह्य करणारी आहेत. 'बजाज फिनसर्व्ह'च्या साथीने तुम्हाला गुंतवणुकीची वाट बघत बसण्याची गरज नाही. त्याकरिता केवळ  25 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेची आवश्यकता लागेल. त्याशिवाय, online application form अगदी सहज भरून तुम्ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसह गुंतवणूक करू शकता. 'बजाज फायनान्स'चा अधिकृत प्रतिनिधी तुम्हाला गुंतवणूक प्रक्रियेविषयी अधिक माहिती देऊन साह्य करू शकतो.

(डिस्केलमर: गुंतवणूकदारांनी असे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या बँकांविषयी किंवा वित्तसंस्थेविषयी योग्य माहिती घेऊनच स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. शिवाय गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपल्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. सकाळ माध्यम समूहाचा गुंतवणुकीच्या निर्णयाशी कोणताही संबंध नाही.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earn good returns on Fixed deposits of bajajfinserv

टॉपिकस
Topic Tags: