आता भरपूर व्याजही मिळवा अन् कर्जही काढा!

टीम ईसकाळ
Friday, 23 August 2019

आता तुमच्या एफडीवर भरपूर व्याज मिळेल. शिवाय तुमच्या एफडीवर तुम्हाला सहज कर्ज देखील उपलब्ध होईल 

बचत खात्यात रोख रक्कम ठेवल्यास तुम्हाला पैशांची तातडीने गरज भासल्यास त्याचा वापर करून गरज भागवता येते. मात्र, बचत खात्यातील रक्कम आपत्कालीन फंड म्हणून वापरताना तुम्ही तुमच्या पैशाची वाढ थांबवत असतात. अर्थात, गुंतवणुकीचे सुयोग्य मार्ग निवडले तर आर्थिक प्रगतीमध्ये अडसर न आणता खात्रीशीर परतावाही मिळू शकतो.

आपल्या बचतीमध्ये स्थिर वाढ करणारे पर्याय हवे असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (fixed deposit ) हा प्राधान्यक्रमाचा गुंतवणूक पर्याय असतो. तुम्ही बजाज फायनान्स फिक्स्ट डिपॉझिट या पर्यायाचा विचार करू शकता. यावर तुम्हाला 8.95 टक्के खात्रीशीर परतावा मिळेलच शिवाय तातडीची निकड भासल्यास एफडीवर तुम्ही कर्जही काढू शकाल.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे हा स्मार्ट निर्णय का ठरतो हे जाणून घ्या

'लोन अगेंस्ट एफडी' म्हणजे काय?
रोख रकमेची तुमची गरज लक्षात घेऊन तुम्हाला जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा तुमची एफडी तारण म्हणून ठेवण्याची मुभा कंपनीतर्फे दिली जाते. शिवाय, बजाज फायनान्स तुम्हाला तात्काळ आणि थेट प्रक्रियेचा पर्याय देऊ करते. त्यामुळे एफडीची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कधीही तुमची रक्कम तारण म्हणून वापरू शकता. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण, यात एफडी न मोडता त्यातील रकमेच्या आधारे तुम्ही तुमच्या गरजेच्या वेळी पैसा मिळवू शकता. त्यामुळे, मुदत संपण्याच्या वेळेला तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळेलच. परिणामी, आर्थिक गरजा सहज आणि सोयीस्कररित्या भागवून तुम्ही कालांतराने संपत्ती वाढवू शकाल.

मुदत संपताना तुम्हाला काय मिळेल?
कर्जाच्या बाबतीत तुमच्यासाठी लवचिक धोरणे असतील. शिवाय, लोन अंगेस्ट एफडीमुळे (loan against FD ) तुमचा निधी आकर्षक व्याजदरासह वाढतो. बजाज फायनान्ससोबत तुम्ही एफडीवर बाजारपेठेतील उत्कृष्ट व्याज मिळवू शकता. ज्येष्ठ नागरिकांना किमान 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 8.95 टक्के व्याजदर  मिळेल. संपूर्ण व्याज मुदत पूर्ण झाल्यानंतर दिले जाईल. तर, नियमित गुंतवणूकदार किंवा सध्या बजाज ग्रूपचे ग्राहक असल्यास याच कालावधीसाठी एफडीवर अनुक्रमे 8.60 टक्के आणि 8.85 टक्के व्याजदर मिळवू शकता. हे कसे मोजले जाते, हे समजून घेण्यासाठी खालील तक्यात नियमित ग्राहक, सध्याचे ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी गुंतवणूक आणि मुदत संपल्यानंतरची रक्कम दाखवण्यात आली आहे. 

No photo description available.

Image may contain: one or more people

Image may contain: text

समजा, तुम्ही मुदती आधीच एफडी मोडायची ( break your FDs) ठरवली असेल तर वर नमूद केलेल्या रकमेवर तुम्हाला पाणी सोडावे लागेल, मुदतीपूर्वी पैसे काढल्याचा दंड भरावा लागेल आणि तुम्हाला देण्यात आलेला ठेवींवरील व्याजदरही मिळणार नाही. कारण, अधिक मुदतीच्या तुलनेत कमी कालावधीसाठी एफडीवर कमी व्याजदर असतो. त्यामुळेच, तुमच्या गुंतवणुकीचा वापर कर्जाचे तारण म्हणून करताना तुम्ही ती स्थिर दराने वाढण्यास वाव देता. या ठेवीवर तुम्हाला व्याज मिळत राहते. अशा रितीने बरीच वर्षे तुम्ही बचतीवर लाभ मिळवत त्यात वृद्धी करू शकता आणि त्याचवेळी गरज भासल्यास चटकन पैसेही मिळवू शकता. 

एफडीमधून लाभ मिळवण्याचे इतर मार्ग कोणते आहेत?
या महत्त्वाच्या वैशिष्ट्याबरोबरच बजाज फायनान्सचे फिक्स्ड डिपॉझिट्स हे गुंतवणुकीचा सहज आणि सोपा मार्ग आहेत. यातील किमान गुंतवणूक रक्कम आहे. फक्त 25 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मोठी रक्कम गोळा होण्याची वाट पाहत बसावी लागणार नाही. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट तुम्हाला निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी साह्य करेलच. शिवाय, निवृत्तीनंतर तुम्ही त्यावर मासिक उत्पन्नही मिळवू शकता.

शिवाय, मल्टि-डीपॉझिट सुविधेच्या माध्यमातून एकाच चेकने किंवा निवडक ठिकाणी उपलब्ध असलेल्या डेबिट कार्ड सुविधेचा वापर करून विविध कालावधीसाठी एकाहून अधिक एफडी करू शकता. यामुळे तुम्ही सहजरित्या गुंतवणुकीला सुरुवात कराल आणि आयुष्यातील उद्दिष्टे साध्य करू शकाल. त्याचबरोबर, गुंतवणूक करताना तुम्ही ऑटो-रीन्युअलचा पर्याय निवडल्यास मुदतीनंतरही तुमची गुंतवणूक आकर्षक व्याजासह वाढत राहील. तुम्ही पुन्हा पैसे गुंतवल्यास बजाज फायनान्सतर्फे तुम्हाला अतिरिक्त 0.10 टक्के व्याज दिला जाईल. या वैशिष्ट्यांसोबतच बजाज फायनान्स फिक्स्ड डीपॉझिटमुळे क्रिसिल आणि आयसीआरएमध्ये तुमचे क्रेडिबिलिटी रेंटिंगही वाढते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर योग्य वेळेत आणि खात्रीलायक परतावा मिळतो. त्यामुळे, असे अनेक लाभ घेण्यासाठी आजच सुरुवात करा.  Fill an online form आणि एफडी सुरू करण्याच्या पुढील प्रक्रियेसाठी बजाज फायनान्सचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Easy loan against FD by Bajaj Finance