रुपयाचे लोटांगण !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - तुर्कस्तानमधील आर्थिक घडामोडींचे पडसाद भारतीय चलन बाजारावर उमटले असून, रुपयाने गुरुवारी नवा नीचांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांच्या अवमूल्यनासह ७०.१६ च्या नीचांकी स्तरावर बंद झाला.

आयात-निर्यातीच्या ताज्या आकडेवारीनंतर व्यापारी तूट आणि वित्तीय तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, रुपयावरील दबाव वाढला आहे. तुर्कस्तानच्या आर्थिक संकटाचे पडसाद जगभरातील चलनांवर उमटले. बाजार सुरू होताच रुपयाने ४३ पैशांच्या अवमूल्यनासह ७०.३२ ची पातळी गाठली. दिवसभरात त्याने ७०.४० चा नीचांकाला स्पर्श केला. 

रुपयातील अवमूल्यन म्हणजे अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवत नाही. गेल्या तीन वर्षांत रुपयाचे मूल्य १७ टक्‍क्‍यांनी वधारले. जानेवारीपासून रुपयात ९.८ टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. अवमूल्यनातून तो वास्तविक मूल्याकडे जात असून अवमूल्यनाचा फारसा परिणाम होणार नाही, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले.

Web Title: The economic developments in Turkey have risen on the Indian currency market