कार्तींना ’ईडी’चा दणका 

पीटीआय
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची भारत, ब्रिटन तसेच स्पेनमधील सुमारे ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिली.

या कारवाईसाठी ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत एक ऑर्डर काढली होती. त्यानुसार कोडाईकॅनॉल आणि उटीतील शेतजमीन, बंगला तसेच दक्षिण दिल्लीतील जोरबाग येथील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. १६ कोटी रुपये किंमतीचा हा फ्लॅट कार्ती आणि त्यांच्या आईच्या नावावर असून, याबरोबर ब्रिटनमधील समरसेट येथे असलेल्या कॉटेज व घरासह स्पेनमधील बार्सिलोनात असलेल्या एक टेनिस क्‍लबही जप्त केल्याचे ईडीने सांगितले.

दरम्यान, चेन्नईतील एका बॅंकेत ‘एएससीपीएल’ या कंपनीच्या नावे असलेल्या ९० लाख रुपयांच्या ठेवीही ईडीने जप्त केल्या असून, या सर्व मालमत्तांची एकूण किंमत ५४ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. 

कारवाई करताना तथ्य व कायद्यातील तरतुदी विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे हा निर्णय कायद्यासमोर टिकणार नाही. माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, याविरुद्ध कायदेशीररीत्या दाद मागणार आहोत. 
- कार्ती चिदंबरम, उद्योजक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED attaches Karti assets worth Rs 54 crore in India