अनिल अंबानी आणखी अडचणीत; 'या' प्रकरणी ईडीचे समन्स 

anil-ambani
anil-ambani

नवी दिल्ली : येस बॅंक गैरव्यवहारप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी समन्स बजावले. अंबानी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मुभा मागितली असून, त्यांना चौकशीसाठी बोलाविण्याची तारीख लवकरच निश्‍चित केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येस बॅंकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची पैशाचा अपहार केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. "ईडी'च्या मुंबईतील कार्यालयात अंबानी यांची चौकशी होणार आहे. करचुकवेगिरी प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अंबानी यांचा जबाब नोंदविला जाणार आहे. यामुळे अंबानी यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. राणा कपूर बॅंकेत कार्यरत असताना त्यांनी मंजूर केलेले कर्ज आणि बॅंकेच्या सर्व मोठ्या कर्जदारांची चौकशी केली जाणार असल्याने अंबानी यांना "ईडी'ने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. प्रकृती कारणास्तव अंबानी यांना पुढील तारीख दिली जाणार आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांनी येस बॅंकेकडून सुमारे 12 हजार 800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. याचे रूपांतर बुडीत कर्जात (एनपीए) करण्यात आले आहे. रिलायन्स ग्रुपबरोबरच एस्सेल, आयएल अँड एफएस, डीएचएफएल आणि व्होडाफोन या कंपन्यांचे कर्ज प्रलंबित आहे. 

येस बॅंकेला 18 हजार 654 कोटींचा तोटा 
डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत येस बॅंकेने 18 हजार 654 कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. चालू वर्षात खासगी क्षेत्रातील बॅंकेने नोंदविलेला हा सर्वांत मोठा तोटा आहे. गेल्या सहा महिन्यांत बॅंकेतून सुमारे 72 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी काढून घेण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com