FlipKart आणि संस्थापकाला लागू शकतो 10000 कोटींचा दंड, ED चा इशारा

flipcart
flipcart

देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आणि त्याचे संस्थापक सचिन बंसल (Sachin Bansal) व बिन्नी बंसल (Binny Bansal) यांच्यावर 10 हजार कोटी रुपयांच्या दंडाची कारवाई होऊ शकते, असा इशारा अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate) दिला आहे. विदेशी गुंतवणूक कायद्याचं (Foreign Investment Laws) उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रॉयटर्सच्या रिपोर्ट्सनुसार, ईडीने फ्लिपकार्ट आणि त्यांच्या संस्थापकांना कारणे दाखवा नोटीस जारी केलं आहे. फ्लिपकार्टकडे याचं उत्तर देण्यासाठी 90 दिवसांचा वेळ आहे.

फ्लिपकार्ट आणि Amazon.com या ई-कॉमर्स यासारख्या कंपन्याकडून विदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केलेय जातेय का? याबाबत गेल्या काही वर्षांपासून ईडीची नजर आहे. मल्टी-ब्रँड रिटेल नियमावलीचे कठोर पालन करुन ई-कॉमर्समधील कंपनी आणि विक्रेत्यावर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून ईडीची ई-कॉमर्स कंपन्यावर नजर आहे.

flipcart
ठाकरे सरकारच्या आक्षेपानंतरही राज्यपाल मराठवाड्याच्या दौऱ्यावर

ईडीमधील एका आधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगतिले की, फ्लिपकार्टने विदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. कंपनीने विदेशी गुंतवणूकधारकांना आकर्षीत करण्यासाठी धारकांना आकर्षीत केलं. तसेच नियमाच्या बाहेर जाऊन शॉपिंग वेबसाइटवर सामानाची विक्री केली. जुलैच्या सुरुवातीलाच याप्रकरणी कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

flipcart
कोरोनामुळे मृत्यू, इन्शुरन्समधून मिळालेले एक कोटी विठ्ठल चरणी

विदेशी गुंतवणूक नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई येथील फ्लिपकार्टच्या कार्यालयात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलं आहे. त्यानुसार, फ्लिपकार्ट, संस्थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांच्यासोबत सध्याचे गुंतवणूकधार टायगर ग्लोबल (Tiger Global) यांना नोटीस पाठवलं आहे. यामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दंड का लावू नये? याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com