निवडणूक आयोगाची शाई लावण्यास हरकत

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बदणाऱ्या नागरिकांच्या बोटावर पुसली न जाणारी शाई लावू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला शुक्रवारी केली.

निवडणूक आयोगाने याविषयी अर्थ मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे, की बॅंका व टपाल कार्यालयांत नोटा बदलणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाई लावण्यात येत आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होईल. निवडणुकांदरम्यान नागरिकांच्या बोटावर शाई लावण्याचे नियम, केंद्र सरकारने यासाठी विचारात घ्यायला हवेत.

Web Title: Election Commission of India against use of indelible ink by banks