EPFOची 'शेअर' गुंतवणूक 10 हजार कोटींच्या पुढे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नोव्हेंबरपर्यंत शेअर बाजारातील एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये (ईटीएफ) 10,484 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती सरकारने लोकसभेत दिली आहे.

"ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणूक 5 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर नेली आहे. नोव्हेंबर 30 पर्यंत ईटीएफमधील एकुण गुंतवणूक 10,483.81 कोटी रुपये झाली आहे", अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत लेखी स्वरुपात दिली.

ईपीएफओने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारातील एक्सचेंज ट्रेडेड फंड्स प्रकारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. सुमारे 4 कोटी सदस्य असलेल्या ईपीएफओकडील ठेवींचे प्रमाण 1.2 लाख कोटी रुपये आहे.

Web Title: EPFO investment in share market goes beyond 10000 crore