esakal | दिवाळीच्या आधी तुमच्या PF खात्यात येणार पैसे; EPFO ने दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

money epfo pf account india

कोरोना व्हायरसमुळे ईपीएफओच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. यानंतर केंद्रीय बोर्डाने व्याज दराची समीक्षा केली होती. 

दिवाळीच्या आधी तुमच्या PF खात्यात येणार पैसे; EPFO ने दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीच्या आधी व्याजाचा पहिला हप्ता खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आधी त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पैसे जमा होतील. सप्टेंबर महिन्यात ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाने म्हटलं होतं की, 31 मार्च 2020 पर्यंत आर्थिक वर्षासाठीचे व्याज वर्षअखेरपर्यंत केलं जाईल. या व्याजाला पहिल्यांदा 8.15 टक्के आणि नंतर 0.35 टक्के अशा दोन भागात दिलं जाणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे ईपीएफओच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. यानंतर केंद्रीय बोर्डाने व्याज दराची समीक्षा केली होती. त्यानंतर बोर्डाने सरकारकडून व्याज दर 8.5 टक्के करण्याची शिफारस केली होती. कामगार मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली होती. तेव्हा म्हटलं होतं की, 8.50 टक्के व्याजातील 8.15 टक्के हे कर्जातून मिळणाऱ्या उत्पन्नातून येतील तर 0.35 टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या विक्रीतून गोळा केले जातील.

हे वाचा - क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा

कोरोना व्हायरसचं संकट पाहून कोविड 19 अॅडव्हान्स आणि आजारासंबंधी क्लेम्सची सेटलमेंट वेगाने करण्यात आली आहे. यासाठी ईपीएफओने दोन गटात ऑटोमोडच्या माध्यमातून सेटलमेंट प्रोसेस केली होती. यातून अनेक क्लेम्स फक्त तीन दिवसातच पूर्ण करण्यात आले होते. सामान्यपणे या प्रक्रियेसाठी जवळपास 20 दिवसांचा कालावधी लागतो. 

पीएफ खात्याची माहिती संकेतस्थळावरून तर मिळतेच पण त्यासोबत तुमच्या रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरवरदेखील देण्याची सुविधा आहे. तुम्ही युएएन पोर्टलवर नोंदणी केली असेल तर रजिस्टर मोबाइल नंबरवरून 011-22901406 नंबरवर मिस कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून एक मेसेज मिळेल. ज्यामध्ये पीएफ खात्याची माहिती देण्यात येते. तुमचा नंबर नोंद असण्याबरोबरच युएएनला बँक खाते, पॅन आणि आधार लिंक असणंही महत्त्वाचं आहे.

loading image
go to top