एरिस लाइफसायन्सेसचा आयपीओ 16 जून रोजी खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

मुंबई: एरिस लाइफसायन्सेस या फार्मा कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) येत्या 16 जून रोजी सुरुवात होत आहे. कंपनीने शेअरविक्रीसाठी प्रतिशेअर 600 ते 603 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. आयपीओ खरेदीसाठी शेवटची तारीख 20 जून आहे.

प्रस्तावित योजनेत कंपनी सुमारे 28,875,000 शेअर्सची 'ऑफर फॉर सेल'द्वारे विक्री करणार आहे. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य एक रुपया आहे.  या हिस्साविक्रीतून कंपनीला कोणतेही भांडवल मिळणार नाही. हिस्सेदारी विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांना हा निधी जाणार आहे.

Web Title: ERIS Lifecycle's IPO opened on June 16